प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना एकनाथ पाटील यांनी आपली मुलगी सौ.दिपाली धनंजय पाटील यांचा मुलगा गौरांग याच्या बारशाच्या निमित्ताने सुनसगाव जिल्हा परिषदेच्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मिसळ, पाव,जिलेबी,फरसाण असे सुंदर स्नेह भोजन दिले. या परिसरात मुख्याध्यापिका आजी ने नातवाच्या बारशा निमित्त आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन दिल्याची बहुतेक ही पहिलीच घटना असावी.यावेळी उपशिक्षीका तायडे मॅडम , गालफाडे मॅडम , जगताप मॅडम , रत्नाबाई कंकरे ,सुरेखा कंकरे यांनी सहकार्य केले. असे कार्यक्रम फटाके फोडून व वायफळ खर्च करून केला जातो मात्र वंदना पाटील व परिवाराने हा आनंद आपल्याच शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांच्या सोबत साजरा केला आहे.यावेळी उपसरपंच एकनाथ सपकाळे व पत्रकार जितेंद्र काटे उपस्थित होते.










