यावल नगर पालीकेच्या सफाई कर्मचारी यांना सातव्या वेतनासह दिवाळीभत्ता द्यावा : मनसेची मागणी

0
54

यावल येथील नगरपालिका साफसफाई कर्मचाऱ्यांना सातवा वेतनासह दिवाळी भत्ता म्हाणून वीस हजार रुपये जाहीर करा अशी मागणी महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्याकडे केली आहे.

कोरोनाच्या काळात येथील नगरपालिका साफसफाई कर्मचाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावले आहे. त्यात मुख्यमत्री उद्धव ठाकरे व नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच सातवा वेतनाची घोषणा केली आहे. बहुतौंश ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. मात्र अध्याप यावल येथील नगरपालिकेत ह्या अंमलबजावणीला सुरुवात झालेली नाही. यामुळे येथील नगरपालिका साफसफाई कर्मचाऱ्यांना सातवा वेतनासह दिवाळी भत्ता म्हाणून वीस हजार रुपये जाहीर करावे असी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी मुख्यमत्री उद्धव ठाकरे व नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच यासंदर्भातील यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोर्डे यांच्याकडेही केली जाणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना रावेर लोकसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी सांगितले आहे.

Spread the love