फलकनाज शेखचे राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक

0
4

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलला जल्लोष
प्रतिनिधी जितेंद्र काटे – भुसावळ – डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी फलकनाज आसिफ शेख हिने राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक पटकावले.तिच्या यशाबददल स्कुलमध्ये जल्लोष व्यक्त करण्यात येत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच जिल्हा क्रीडा कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रीडा संकुलात २९ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या या स्पर्धेत अंडर-१७ मुलींच्या गटात फलकनाजने द्वितीय क्रमांक मिळविला. फलकनाजच्या या यशामुळे डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत शाळेला पहिले रौप्यपदक मिळविण्याचा मान तिने मिळविला आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांनी फलकनाजचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Spread the love