ग्रामीण भागातील एसटी बससेवा सुरू ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवेदन ! 

0
2

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – जळगाव व भुसावळ आगारातून ग्रामीण भागात जाणाऱ्या बंद पडलेल्या बस फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात आणि शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी नियमित बस सेवा सुरू ठेवावी या अत्यंत महत्त्वाच्या व गंभीर विषयावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सामाजिक कार्यकर्ते सागर तायडे ( गोजोरे ) यांनी सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व अधिकृत निवेदन सुपूर्द केले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा व अभ्यासाचा प्रश्न: असल्याने पंडित नेहरू विद्यालय वराडसीम व दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय सुनसगाव येथे तसेच नशिराबाद येथे आयटीआय गोजोरे येथून येणाऱ्या १२० हून अधिक शालेय विद्यार्थ्यांसाठी दुपारी सुटणारी ‘जळगाव ते वराडसीम’ (व्हाया नशिराबाद – सुनसगाव) ही बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली. शाळा ५:०० वाजता सुटत असल्याने बसअभावी विद्यार्थ्यांना रात्री उशिरा घरी पोहोचावे लागते, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच शनिवार, रविवार व सुट्ट्यांच्या दिवशी नियमित बससेवा गोजोरे, वांजोळा, वराडसीम, सुनसगाव, बेलव्हाय , चोरवड या ग्रामीण भागांत शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी एसटी फेऱ्या पूर्णपणे बंद ठेवल्या जातात. यामुळे रुग्ण, नोकरदार व कामगारांची मोठी गैरसोय होते. या दिवसांतही नियमित बस फेऱ्या सुरू ठेवण्याची आग्रही मागणी केली.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रश्नांची गंभीर दखल घेत संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देण्याचे आश्वासन दिले आहे.

विद्यार्थी, शेतकरी व ग्रामीण भागातील प्रवाशांची होणारी अडचण दूर होईपर्यंत आणि बससेवा सुरळीत होईपर्यंत आपला हा पाठपुरावा असाच सुरू राहणार असल्याचे सागर सुनिल दोडे

(प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस) यांनी सांगितले असून या सर्व गोष्टींचा पाठपुरावा सागर दोडे करीत असल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सैनिक लक्ष्मण कोळी गोजोरे , सौ नंदा कोळी सरपंच गोजोरे , सौ काजल कोळी सरपंच सुनसगाव , विलास पाटील ग्रामपंचायत सदस्य वराडसीम व विद्यार्थी पालकांनी अभिनंदन केले आहे.

Spread the love