पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगाव बुद्रुकच्या तरुणाचा जागीच मृत्यू

0
3

जळगाव : पाळधी बायपास रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरचा ताबा सुटल्याने तो भीषणरीत्या पलटी झाल्याची घटना घडली. या भीषण अपघातात दोनगाव बुद्रुक येथील कोळी समाजातील एका तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने दोनगाव बुद्रुकसह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

अपघाताची माहिती मिळताच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी अपघाताची पाहणी करून स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने तातडीने मदतकार्य सुरू केले.

प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून रुग्णवाहिका पाचारण केली तसेच पुढील आवश्यक वैद्यकीय आणि कायदेशीर कार्यवाहीसाठी संबंधित यंत्रणेशी समन्वय साधला.

या अपघातामुळे दोनगाव बुद्रुक गावावर तसेच कोळी समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली.

दरम्यान, स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनेची नोंद घेतली असून अपघात नेमका कशामुळे झाला, याचा पुढील तपास सुरू आहे.

Spread the love