सुनसगावच्या ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकारी नसल्याने ग्रामसभेला स्थगिती ?

0
8

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकारी ऐवजी अंगणवाडी सेविका सचिव पदाची जबाबदारी पार पाडत असताना ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्याने ग्रामसभा स्थगीत करण्यात आली यावेळी महिला सभा मात्र घेण्यात आली.

या बाबत माहिती अशी की , दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता महिला ग्रामसभा व १०:३० वाजता सर्वसाधारण ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ग्रामसभा घेण्यात आली नसल्याने या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सुरवातीला महिला ग्रामसभा घेण्यात आली मात्र गावातील महिलांनी या सभेला अनुपस्थिती दाखवली होती परंतु काही वेळाने गावातील १५ ते २० महिला आल्याने कोरम अभावी तहकूब करण्यात आलेली महिला ग्रामसभा घेण्यात आली त्यात सुरवातीलाच उपस्थित महिलांनी केबल चोरीचा मुद्दा उपस्थित केल्याने सभेला वेगळे वळण लागले व तीन विषयांवर चर्चा होऊन महिला ग्रामसभा संपली. लगेच त्याच ठिकाणी सर्वसाधारण सभेला सुरुवात करण्यात आली असता ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित नसल्याने सभेचे सचिव म्हणून अंगणवाडी सेविका यांनी अजेंडा वाचायला सुरुवात करताच ग्रामस्थांनी आक्षेप घेतला व ग्रामपंचायत अधिकारी जो पर्यंत सभा घेणार नाही तो पर्यंत सभा तहकूब करण्याची सूचना केली. त्यामुळे कोणताही विषय मंजूर न करता सभा स्थगीत करण्यात आली. सुरवातीला लाऊडस्पिकरची व्यवस्था करण्यावरून वादाला तोंड फुटले. त्यानंतर गावातील तरुणांनी अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी शांततेचे आवाहन केले मात्र ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित असल्याने गावातील युवकांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन आपल्या समस्या मांडल्या व नियमाप्रमाणे प्रत्येक वार्डात अगोदर ग्रामपंचायत सदस्यांनी सभा घ्यावी व त्यानंतर ग्रामसभेचे आयोजन करण्यात यावे अशी व इतर विषयांवर चर्चा करण्यात आल्याचे समजते. ग्रामसभेला अनुपस्थितीत असल्याबाबत ग्रामपंचायत अधिकारी यांना विचारले असता ग्रामसेवक युनियन ने ग्रामसभेवर बहिष्कार टाकला आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका यांच्याकडे सचिव पदाचा कार्यभार देण्यात आल्याचे ग्रामसेवक प्रतिभा तायडे यांनी सांगितले तर अजेंड्यावर असलेले घरकुल योजना मंजूरी वाचन व सन २०२६/२७ चा कृती आराखडा मंजूर करणे गरजेचे असल्याने या सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सरपंच काजल कोळी यांनी सांगितले.

सभा झाली नसल्याने ज्या अर्जदारांनी आपले अर्ज दिले होते याचे वाचन करण्यात आले नाही.

या सभेत ग्रामपंचायत विहिरीतील केबल वायर चोरीच्या फिर्यादीत शिपाई पंकज पाटील यांच्या नावाचा उल्लेख असल्याने नाव कोणी टाकले या मुद्द्यावर चर्चा होणार होती मात्र सभा झाली नसल्याने ग्रामपंचायत शिपाई पंकज पाटील यांनी नाराजी व्यक्त करत न्याय न मिळाल्यास ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर अब्रूनुकसानीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले. यावेळी आता ग्रामसभा कधी होणार अशी चर्चा सुरू होती.

Spread the love