प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – सुनसगाव येथून जवळच असलेल्या वराडसिम या ठिकाणी पोळा सण व गणेशोत्सव व इतर सण साजरे करण्यासाठी शांतता समितीची सभा घेण्यात आली यावेळी तंटामुक्ती समिती , शांतता समिती व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून सभा घेण्यात आली.यावेळी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी डीवायएसपी प्रशांत दरेकर साहेब यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सर्व सण उत्सव शांततेत साजरे करा . कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच निलप्रभा पाचपांडे होत्या सुत्रसंचालन बापू सोनवणे यांनी केले. पोळा सण कसा साजरा केला जातो या बाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष विलास पाटील यांनी माहिती दिली तर प्राण्यांचे संरक्षण झालं पाहिजे प्राण्यांना आरी मारली जाते तसे करु नये प्राण्यांना संरक्षण पाहिजे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अक्षय सपकाळे यांनी सूचना मांडल्या जोगोलखोरी येथील महिलांनी दारूबंदीसाठी अर्ज देखील या मीटिंगमध्ये दिला . यावेळी पीएसआय संजय कंखरे ,पोलीस पाटील सचिन वायकोळे , तंटामुक्ती अध्यक्ष उत्तम सोनवणे , तंटामुक्ती सदस्य काशिनाथ पाटील , ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील , प्रकाश ठाकूर, पिंटू ठाकूर,गोपनीय चे विनोद पाटील , पोहेकाॅ विकास बाविस्कर , सचिन पारधी , गणेश मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी , कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










