प्रतिनिधी – जितेंद्र काटे –
भुसावळ – तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सुसरी येथील शेतकरी कुटुंबातील पती पत्नी कांदे पिकाला पाणी भरण्यासाठी गेले असता विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दि.२६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली.
शेतात कांदा पिकाला पाणी भरण्यासाठी हे दांपत्य गेले होते मात्र, शेतात वन्यप्राणी यांच्या पासून पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून शेतात झटका मशिन लावण्यात आले होते या झटका मशिन चा शाॅक लागल्याने अशोक बाबुराव पाटील व सरीता अशोक पाटील यांचा मृत्यू झाला असल्याचे प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे.
वास्तविक पाहता या झटका मशिन मध्ये विज प्रवाह आलाच कसा या बाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी या परिसरातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.











