प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे श्री महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कोळी समाज बांधवांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बसस्थानक चौकातील फलकाचे पूजन करण्यात आले तसेच महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले गावातील पदाधिकारी तसेच कोळी समाज बंधू भगिनी यांनी पूजन केले. शांततेत कार्यक्रम पार पडला.









