प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे सध्या सफाई कामगार नसल्याने गावात ठिकठिकाणी गटारी तुंबल्याने डासांचा उपद्रव वाढला असल्याने काही ग्रामस्थ स्वताहून गटारी साफसफाई करून घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून येथे सफाई कामगार नाही त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. गावातील अनेक गटारी तुंबल्याचे दिसत आहे गावात यापूर्वी गोंभी येथील एक व्यक्ती साफसफाई चे काम करीत होता मात्र काही दिवसांपासून गटारी साफसफाई केली जात नसल्याने सफाई कर्मचारी याला विचारले असता ग्रामपंचायत कार्यालयाच्या सदस्यांनी कामावर ठेवण्यास नकार दिला आहे असे सांगीतले.या सफाई कामगाराला कामावर ठेवण्यासाठी काही सदस्यांचा होकार आहे तर काही सदस्यांचा नकार आहे त्यामुळे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना विचारले असता नवीन सफाई कामगार मिळण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले आहे.
वास्तविक पाहता गोंभी आणि सुनसगाव दोन्ही गावं मिळून ग्रामपंचायत कार्यालय आहे. गावात कोणाचे निधन झाले किंवा शुक्रवारी बाजाराची साफसफाई असे काम त्याच कामगाराला सांगितले जाते मग नवीन सफाई कामगार मिळत नाही तो पर्यंत या कामगाराने गटारी साफसफाई केली तर काय होईल ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वास्तविक पाहता ठराविक भागातीलच गटारी वाहतात वार्ड क्रमांक तीन मध्ये तर गटारींची अवस्था गंभीर असल्याचे सांगितले जाते आता काही दिवसांपूर्वी वार्ड क्रमांक तीन मधील गटारीच्या कारणावरून ग्रामपंचायत सदस्य व एका सुज्ञ नागरिकाची ‘ तू तू मैं मैं ‘ झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे गावासाठी एकतरी कायमस्वरूपी सफाई कामगार असावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तसेच गावातील सर्व गटारी वर डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जंतूनाशक पावडर किंवा औषधाची फवारणी करण्यात यावी अशी मागणी गावातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.










