प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – भारतीय संस्कृती मध्ये भाऊबीज व रक्षाबंधन हे सण अतिशय महत्त्वाचे मानले जातात एवढे काय तर भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे हे सण प्रतिक मानले जातात पण बऱ्याचदा असे आत्मीयता वाटणारे हे सण आयुष्यभर आठवण ठेवून जातात.असाच प्रसंग यावल तालुक्यातील डोंगर सांगवी या गावात घडला.यावल तालुक्यातील डोंगर सांगवी येथील रहिवासी गं भा प्रमिलाबाई पंडित बाऊस्कर ( धनगर ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचे माहेर टाकरखेडा ता यावल येथील होते. याच वर्षी भाचाचा विवाह झाला असल्याने यंदा रक्षाबंधनासाठी दोन दिवस अगोदर येईल असे भाऊ विठ्ठल सोनवणे यांना एकुलती एक बहिण प्रमिलाबाई सांगून गेली होती.मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते.त्यामुळे रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदर आजारी पडलेल्या बहिणीचे निधन झाले आणि रक्षाबंधनाच्या सणावर जणू विरजण पडले. प्रमिलाबाई बाऊस्कर यांच्या पश्चात मुली , जावई ,भाऊ , वहिनी ,भाचे , नातवंडे असा परिवार असून त्या टाकरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते लोकेश सोनवणे व सोनू सोनवणे यांच्या आत्या होत्या.












