जळगाव संदेश न्युज नेटवर्क
ममुराबाद – आज दिनांक १९ रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विवीध कामांचे कामांचे भूमिपुजन करण्यात आले. यामध्ये राज्य मार्ग क्रमांक ६ वरील आसोदा ते देऊळवाडा दरम्यानच्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि आसोदा येथील बल्यांची वाट व इंदिरानगर ते कन्याशाळेच्या रस्त्याचे कॉंक्रीटीकरण ( २ कोटी) ; आसोदा ते देऊळवाडा दरम्यानच्या रस्त्याची विशेष दुरूस्ती ( १ कोटी २६ लाख रूपये) ; आसोदा ते ममुराबादच्या दरम्यानच्या रस्त्याची सुधारणा ( ३ कोटी ४० लाख ) ; जळगाव ते विदगाव रस्त्याचे डांबरीकरण (२ कोटी ३७ लाख) ; नांद्रा ते भोलाणे दरम्यानच्या रस्त्याचे काम (८६ लक्ष रूपय) आणि अवचित हनुमान फाटा ते मंदिरापर्यंतचे कॉंक्रिटीकरण आणि मंदिर परिसरात सभामंडपाच्या ४२ लाख रूपयांच्या कामाचे भूमिपुजन देखील आज करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, सार्वजनीक बांधकाम खात्याचे सहायक अभियंता श्रेणी-१ सुभाष राऊत, शाखा अभियंता ए.व्ही. सूर्यवंशी, जे.के. महाजन, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, पंचायत समिती सभापती ललीताताई पाटील, युवा सेना जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, जनाआप्पा कोळी, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष रमेशआप्पा पाटील, पंकज पाटील, मुकेश सोनवणे, तुषार महाजन, अनिल भोळे, किशोर चौधरी, विदगाव सरपंच प्रतिभाताई सपकाळे, डॉ. कमलाकर पाटील, पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार, शिवाजी कोळी, जितू पाटील, राजू बेडीस्कर, ठेकेदार सुधाकर कोळी, नानाभाऊ सोनवणे, भरत बोरसे, यांच्यासह ममुराबाद येथील सरपंच हेमंत चौधरी, उपसरपंच शेख अशमाबी नासीर, महेश चौधरी, तसेच ग्रामपंचायत सदस्य, त्याच प्रमाणे परिसरातील सरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच युवा सैनिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.












