माध्यमिक विद्यालय शिरसाड साकळी येथे संविधान दिन साजरा

0
45

दिपक नेवे

 

शिवाजी मित्र मंडळ संचलित माध्यमिक विद्यालय येथे संविधान दिन अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला,दि. 23 नोव्हेंबर ते दि.26 नोव्हेंबर या कालावधीत विद्यालयात माझे संविधान, माझा अभिमान’हा उपक्रम राबविला गेला. त्या अंतर्गत चित्रकला स्पर्धा,निबंध लेखन आणि घोषवाक्य स्पर्धा राबविण्यात आल्या.

दि.26नोव्हेबर रोजी संविधान दिन अतिशय उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ संध्या अनंत शिंदे या अध्यक्षस्थानी होत्या.त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापिका सौ शिंदे मॅडम यांनी संविधानाचे वाचन केले. उपशिक्षक श्री श्याम पाटील सर यांनी आपल्या भाषणातून संविधानाबद्दल माहिती दिली.याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपशिक्षिका सौ.शुभदा नेवे मॅडम यांनी केले.

Spread the love