शॉट सर्किटच्या आगीमुळे एटीएमची रक्कम लुटीपासून वाचते तेव्हा..

0
45

फैजपूर -येथील बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील रहदारी तसेच दवाखान्यामुळे सतत गजबजलेल्या दूध शीतकरण केंद्राच्या समोर स्टेट बँकेचे एटीएम दि. २६ ते २७ च्या मध्यरात्री गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन तोडून रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न शार्ट सर्किट ने लागलेल्या आगीमुळे फसला आहे. फैजपुर शहरात पोलिस यंत्रणा डोळ्यात तेल घालून रात्री गस्त यंत्रणा राबविण्यात येत असतांनाही या एटीएम फोडीच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

फैजपूर येथील यावल रोडवरील स्टेट बँकेचे एटीएम दिनांक २६ ते २७ च्या मध्यरात्री चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न करीत असताना कटरने इलेक्ट्रिक वायर कट झाल्याने शॉर्टसर्किट झाले. चोरट्यांनी लागलीच पळ काढला.पहाटेच्या सुमारास रोड वरील फिरणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या एटीएममधून धूर निघत असल्याचे काही जणांना दिसून आले. यामुळे नागरिकांनी स्टेट बँकेतील कर्मचाऱ्यांना फोन लाऊन याबाबतची माहिती दिली असता स्टेट बँकेचे सर्विस मॅनेजर संजय रंगवाला,रोखपाल वेलचंद वाघुळदे ,युवराज तायडे, विवेक गहिलोत या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पोलीस स्टेशन आणि अग्नमीशमन दलास पाचारण केले.

सदर घटनेचे वृत्त कळताच फैजपूर पोलिस स्टेशनचे एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर, पीएसआय मोहन लोखंडे सह पोलीस स्टाफ यांनी घटनास्थळाची पाहणी केली.उपअधीक्षक चंद्रकांत गवळी यांनीही भेट दिली. यावेळी फिंगर प्रिंट व श्वानपथकाला सुद्धा पाचारण करण्यात आले होते.

दुपारी दोन वाजता एटीएम ऑपरेटिंग सी.एम.एस कंपनीचे कस्टमर इंजिनियर रविकांत पाटील व जितेंद्र सोनवणे हे जळगाव येथून आल्यानंतर पोलिसांनी एटीएम ची पाहणी करून पंचनामा केला.यावेळी दोन हार्डडिक्स ताब्यात घेण्यात आले. मात्र एटीएम चे रक्कम मेंटेनन्स नाशिक येथील कंपनी कडे असल्याने सदर अधिकारी फैजपूर शहरात आल्याशिवाय सदर एटीएम मधील रोख रकमेचा तपशील कळू शकेल.

मात्र सदर सुत्रांकडून समजते की एटीएम मध्ये नुकताच रक्कम भरणा करण्यात आला होता. साधारण रकमेचा अंदाज चाळीस लाखापर्यंत दिला जात आहे.सदर घटना प्रकारातील अज्ञात चोरटे हे सराईत गुन्हेगार असावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एटीएम खोलीतील सीसीटीव्ही कॅमेरा वर काळया रंगाचा स्प्रे चोरट्यांकडून मारण्यात आल्याने सदर काळे कृत्य कॅमेऱ्यात कैद झालेली नसली तरी याप्रसंगी सदर चोरटे हे एका व्हाईट रंगाच्या कार मध्ये आल्याचे निदर्शनास आले असल्याचे कळते. पुढील तपास कार्य सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासन करीत आहे.

Spread the love