मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासांत अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. ढगांच्या गडगडटासह पावसाचा अंदाज असून सोमवार ते गुरुवारपर्यंत राज्यातील अन्य दहा जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दक्षिण अंदमान समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या 12 तासांमध्ये ते अधिक चिन्हांकित होऊन पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावाखाली, अंदमान आणि निकोबार बेटांवर एकाकी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुंबईसह कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता संमिश्र पानावर
असून यलो अलर्ट जारी करण्यात आला. तर उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाट्याचा वाऱ्यासह मेघागर्जेन पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्याच सोबत पुणे,रायगड ,रत्नागिरी,कोल्हापूर, सातारा,सांगली,सोलापूर सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये देखील सोमवार पासून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यादरम्यान काळजी घेण्याची आवाहन हवामान विभागाने केले
शहर कमाल किमान आद्रता
मुंबई कुलाबा 33.2 23.20 65
मुंबई सांताक्रूझ 29.8 – 63
पुणे 30.8 13.8 90
गोवा पणजी 32.0 20.8 78












