निंभोरा स्टेशन परिसर येथे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट

0
47

राजेंद्र महाले

रावेर प्रतिनिधी— रावेर तालुक्यातील निंभोरा येथील जि प शाळा स्टेशन परिसर येथे गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद होत्या मात्र आता शासनाच्या आदेशानुसार सर्व नियमांचे अनुसरून शाळा सुरू करण्यात आल्या असून पहिल्याच दिवशी जून महिन्याचा भास झाला यावेळी शिक्षक वर्ग यांनी मुलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तसेच तसेच सॅनिटायझर थर्मल गण मास्क वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीपभाऊ खैरे मुख्याध्यापक पल्लवी राणे मॅडम व शिक्षक माधुरी भदाने, विशाल सोनवणे तसेच अक्षय महाले, अजहर शेख, जावेद खाटीक आणि शालेय विद्यार्थी बालगोपाल यांचं उस्फुर्त स्वागत करून वर्ग सुरू करण्यात आले.

Spread the love