ममुराबाद येथे शाळेची घंटा वाजली ; पहिल्याच दिवशी २० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती !

0
94

ममुराबाद – : कोरोनाच्या महामारीमुळे जवळपास २ वर्षांनंतर तालुक्यातील ग्रामीण भागातील इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंतच्या शाळांचे कामकाज बुधवारी सुरू झाले. सर्व विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन तसेच फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत स्वागत झाले तर ममुराबाद येथे जिल्हा परीषदेच्या शाळेत चॉकलेट वाटप करण्यात आले.

येथील जि प शाळेतील मुख्याध्याप श्री अविनाश मोरे. यांनी कोरोना चे नियम पाळण्याच्या विद्यार्थ्यांना सूचना दिल्या. दरम्यान शिक्षीका सौ कल्पना चौधरी.प्रीती चौधरी. स्वाती पाटील.सारिका बधान .आरती चौधरी.ज्योती महाजन .पुनम शिंम्पी.हेमलता जयस्वाल.यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी गावातील कैलाश ढाके सह इतर नागरीक उपस्थित होते.

Spread the love