कानळदा (बॉईज) शाळेत विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत…

0
56

विजय सपकाळे

कामळदा -तब्बल दोन वर्षानंतर विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू झाल्या आहेत.जि.प.शाळा कानळदा(बॉईज) शाळेची घंटा वाजली. *शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स ठेवून सॅनेटाईज करण्यात आले. तापमान मोजण्यात आले. विद्यार्थ्यांचे मास्क व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याशिवाय शालेय कालावधीत कोरोना नियमांचे पालन करण्यात आले*.

शासनाच्या आदेशानुसार १ डिसेंबर पासूनचे सर्व वर्ग सुरू करण्यात आले. कानळदा(बॉईज) येथील शाळेत देखील पहिल्याच दिवशी मुलांमध्ये उत्साह दिसून आला. दोन वर्षानंतर मुले शाळेत आल्याने विद्यार्थ्यांचे शा. व्य. स. च्या सहकार्याने उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व शालेय परिसर आकर्षक रांगोळ्यांनी सजविण्यात आलेला होता. शाळेच्या गेटवर विद्यार्थ्यांचे जसजसे आगमन होत होते तस तसे त्यांच्यावर फुलांच्या पाकड्यांचा वर्षावही शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांकडून करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शा. व्य. स. व गावकऱ्यांच्या सहकार्याने शालेय परिसरात मंडपासह खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी शा. व्य. स. चे अध्यक्ष,सदस्य,कानळदा सरपंच,ग्रा.प.सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

दोन वर्षानंतर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर श्री.डी बी चव्हाण साहेब व सेवानिवृत्त ग्रेडेड मुख्याध्यापक श्री. मुरलीधर पुंडलिक सपकाळे सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

Spread the love