रावेर प्रतिनिधी– तालुक्यातील निंभोरा येथे अखेर ग्रामसचिवालय बांधकामाचा मुहूर्त मिळाला कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सरपंच सचिन महाले व ग्रामपंचायत माजी उपसरपंच सुभाष पाटील महाराज उपसरपंच रंजनाताई प्रशांत पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दुर्गादास भाऊ पाटील माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य दिगंबर दादा चौधरी शेख दिलशाद सर सदस्य अमोल खाचणे चंद्रकांत खाचणे स्वप्निल गिरडे दस्तगीर खाटीक मनोहर तायडे सायराबी युनूस खान निर्मलाबाई महाले ग्रामसेवक गणेश पाटील ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत आज दिनांक ७/१२/२०२१ मंगळवार रोजी आठवडे बाजार चौकात संपन्न झाला लागलीच ग्रामपंचायतीचे ग्रामसचिवालय बांधकामास सुरुवात झाली असून ते लवकरात लवकर बांधले जाईल असे सरपंच सचिन महाले यांनी सांगितले.












