अमोदा खु ते घार्डी रस्त्यावर अनोळखी वहानाने धडक दिल्याने महिलेचा मृत्यु

0
51

जळगाव – तालुक्यातील अमोदा खु ते घार्डी रस्त्यावर दिनांक १५ रोजी रात्री साधारण पावने आकराच्या सुमारास कोणत्या तरी अज्ञात वहानाच्या धडकेत एका महिलेचा मृत्यु झाला आहे. सदर अपघात झालेल्या महिलेचे अंदाजे वय ७० ते ७५ असल्याची माहिती अमोदा येथील पोलीस पाटील राहुल दिलीप सपकाळे यांनी तालुका पोलीसात दिल्‍याने आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

सदर महिलेस कोणी ओळखत असल्यास तालुका पोलीस स्टेशनचे विश्वनाथ गायकवाड मो नं 9594941615, किंवा अनिल तायडे मो नं 9423492108 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love