भारतीयांच्या आयुष्यात कोरोनामुळे दोन वर्षांनी घट

0
44

मुंबई :  International Institute For Population Studies(IIPS) यांनी केलेल्या अभ्यासानुसार कोरोनामुळे(CORONA) भारतीयांच्या आयुष्यात दोन वर्षांनी घट झाली आहे. फक्त भारतातच नाही तर संपुर्ण जगभरातील लोकांच्या आयुष्यमानात कोरोनामुळे बदल झाला असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

कोरोनामुळे मानवी आयुष्यावर कीती दूरगामी परिणाम झालेत याचा अभ्यास संशोधकांकडून करण्यात येत आहे. त्यापैकीच एक असलेल्या मुंबईतील International Institute For Population Studies(IIPS) संस्थेने हा धक्कादायक खुलासा केला आहे . एका संशोधनातून पुढे आला आहे की कोरोनाच्या महासाथीमुळे भारतीयांच्या आयुर्मानामध्ये कमीतकमी दोन वर्षांनी घट झाली आहे. या साथीमुळे शारिरीक स्वास्थ्याबरोबर मानसिक आरोग्यावर सुद्धा दुरगामी परिणाम झाल्याचे निदर्शनास आले आहे.

Spread the love