मामाच्या गावी आलेल्या‎ ‎१० वर्षीय‎ ‎भाच्याचा शॉक‎ ‎लागून मृत्यू‎

0
197

यावल -तालुक्यातील डांभुर्णी येथे मामाच्या गावी यात्रेनिमित्त आलेल्या‎ ‎१० वर्षीय‎ ‎भाच्याचा शॉक‎ ‎लागून मृत्यू‎ ‎ झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

या अधिक माहिती अशी की, गावातील यात्रेनिमित्त डांभुर्णी‎ येथील रहिवासी सागर अशोक‎ सपकाळे यांच्याकडे बहिण व भाचा गावातील यात्रेनिमित्त आले असता शुक्रवारी दुपारी‎ ग्रामपंचायती कडून नळांना पाणी‎ पुरवठा सुरू होता. यावेळी सपकाळे‎ ‎ यांच्या घरात पाणी भरण्यासाठी‎ इलेक्ट्रिक मोटार लावली होती.‎ या दरम्यान घराच्या ओट्यावर पाणी‎ सांडले. याच ओल्या ओट्यावर‎ पंपाच्या वायरमधून वीज प्रवाह‎ उतरला होता. नेमके यावेळी सागर‎ सपकाळे यांचा भाचा भावेश‎ साईनाथ बागुल,रा.कोळगाव‎ ता.भडगाव, , वय १०,हा खेळण्यासाठी पायात‎ चप्पल न घालताच घराबाहेर‎ निघाला. मात्र, ओल्या ओट्यावर‎ शॉक लागून तो खाली कोसळून‎ बेशुद्ध झाला. यानंतर त्याला‎ जळगाव येथे जिल्हा शासकीय‎ वैद्यकीय महाविद्यालय व‎ रुग्णालयात दाखल करण्यात आले.‎ मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित‎ केले. शुक्रवारी रात्री डांभुर्णीत‎ अंत्यसंस्कार झाले.‎

Spread the love