मलिकांचं नवं ट्विट चर्चेत; पण निशाणा कोणाकडे ?

0
48

मुंबई -विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन चांगलच गाजत आहे. अधिवेशनाच्या पहिला दिवस भास्कर जाधवांनी पंतप्रधान मोदींची केलेली नक्कल आणि त्यानंतर मागावी लागलेली माफी यामुळे गाजला. तर दुसऱ्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना डिवचलं. म्यॉव म्यॉव असा आवाज काढत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. नितेश राणेंच्या या कृतीला आता अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एका फोटोद्वारे उत्तर दिलंय.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सभागृहात जात होते. त्यावेळी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसलेल्या भाजप आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती. त्याचवेळी नितेश राणे यांनी मांजरीचा आवाज काढत आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे निघून गेले. नितेश राणेंचा हा आवाज टीव्ही चॅनेलच्या कॅमेरात कैद झाला. याबाबत नितेश राणेंना विचारलं असता बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही. शिवसेनेच्या वाघाची आता मांजर झालीय, अशी टीका त्यांनी केली होती.

मलिकांकडून खास फोटो ट्वीट;पैहचान कौन?

Spread the love