मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगितमुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासने
अटल पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा विचार
कर्मचाऱयांना स्वतःचे नॉमिनेशन करण्याची मुभा
कर्मचाऱयांना मिळणार रु. 5 लाख निवृत्तीलाभ
मदतनीसांना मिळणार रु. 3 लाख निवृत्तीलाभ
अंगणवाडी कर्मचाऱयांच्या वेतनात वाढ करण्यासंबंधी नव्याने अधिसूचना जारी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्याने सदर आंदोलन तूर्त स्थगित ठेवण्यात आले आहे. वेतनवाढ सोडल्यास अधिकतर मागण्या गुरुवारी झालेल्या बैठकीत मान्य झाल्या असल्याचे कामगार नेते ऍड. हृदयनाथ शिरोडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अंगणवाडी कर्मचारी व मदतनीसांना वेतनवाढ करण्याची अधिसूचना 2019 मध्ये जारी झाली होती. त्यात कर्मचाऱयांना महिना दीड हजार रुपये तर मदतनीसांना 500 रूपये वाढ देण्यात आली होती. पण हा आदेश कागदोपत्रीच राहिला. त्याची अंमलबजावणी कधी झालीच नाही.
मुख्यमंत्र्यांची अंगणवाडी कर्मचाऱयांशी चर्चा
गेली 10 वर्षे वेतनवाढ करण्यात आली नसल्याने वेतनवाढ व इतर मागण्या लेखी स्वरुपात सादर करून शेवटी कर्मचारी रस्त्यावर उतरले. 6 दिवस आझाद मैदानावर दिवस रात्र ठिय्या आंदोलन केले. सातव्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या आल्तीनो येथील शासकीय बंगल्यासमोरील रस्त्यावर बैठक मारून रस्ता अडवला. बुधवारी रात्री उशिरापर्यंत आल्तीनो येथे नाटय़मय घटना घडल्या. गुरुवारी सकाळी मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱयांच्या नेत्यांशी चर्चा केली.
अटल पेन्शनचा लाभ देण्याचा विचार
या कर्मचाऱयांना निवृत्ती वेतन लागू करावे अशी मागणी मांडण्यात आली होती. ती मुख्यमंत्र्यांनी फेटाळली. अटल पेन्शन योजनेचा लाभ त्यांना कसा देता येईल त्यावर सरकार विचार करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
अटल पेन्शन योजनेसाठी 40 वर्षाची वयोमर्यादा आहे. पण 80 टक्के कर्मचारी 40 वर्षापेक्षा अधिक वयाचे असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या नजरेत आणून दिताच त्यावर तोडगा काढण्यावर विचार करू असे मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीत स्पष्ट केले.
तीन व पाच लाख मिळणर निवृत्तीलाभ
एखाद्या अंगणवाडी कर्मचाऱयाचे निधन झाल्यास निवृत्ती निधी त्याच्या वारसदारांना मिळत नव्हता, कारण नॉमिनेशन सेवा उपलब्ध नव्हती. आता या कर्मचाऱयांना नॉमिनेशन भरण्याची मुभा देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. कर्मचाऱयांसाठी 5 लाख तर मदतनीसांना 3 लाख निवृत्ती मोबदला देण्याचे या बैठकीत ठरले.
अंगणवाडी कर्मचारी व मदतनीस योजना ही पेंद्र सरकारची आहे. त्यामुळे या कर्मचाऱयांना सेवेत कामय करता येत नाही. ज्यांनी 10 वर्षापेक्षा कमी सेवा केली त्यांना 10 हजार रुपये पर्यंत देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला तर संघटनेने 3 हजार रुपयांची वाढ मागितली. अंगणवाडी मदतनीसांना दरमहा 6 हजार ऐवजी 10 हजार रुपये देण्याची मागणी झाली. या संदर्भात नव्याने अधिसूचना जारी करून वेतनवाढ स्पष्ट करण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. ही नवी अधिसूचना जारी होईपर्यंत आंदोलन स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
महला व बाल कल्याण खात्याची अधिसूचना
अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांना वेतनवाढ देण्याची अधिसूचना दि. 20 डिसेंबर 2021 रोजी महिला व बाल विकास संचलनालयाने जारी केली आहे. सदर अधिसूचना अमान्य असल्याचे ऍड. हृदयनाथ शिरोडकर यांनी सांगितले. या अधिसूचनेप्रमाणे वेतन वाढीचा तक्ता देण्यात आला असून तो खालील प्रमाणे आहे.
अंगणवाडी कर्मचाऱयांना मिळणारे मानधन
सेवेचा कालावधी मानधन केंद्राचा वाटा राज्याचा वाटा राज्याची अतिरिक्त वाढ एकुण मानधन
0-5 वर्षे 4500 2700 1800 5500 10000
05-10वर्षे 4500 2700 1800 6500 11000
10-15वर्षे 4500 2700 1800 7500 12000
15-20 4500 2700 1800 9500 14000
20-25 4500 2700 1800 11500 16000
25व अधिक 4500 2700 1800 13500 18000












