दारू विक्री परवानाच्या बोगस ठरावावरून खिर्डीच्या ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला धरले धारेवर खिर्डी बुद्रुक ग्रामपंचायत ला 300 ते 400 ग्रामस्थांची उपस्थिती, निंभोरा पोलिसांनी पागवली गर्दी

0
49

ग्रामविस्तार अधिकारी व गटविकास अधिकारी यांची खिर्डी ग्रामपंचायतला भेट खिर्डी ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी विजयकुमार महाजन यांनी बोगस ग्रामसभा ठराव तयार करून ग्रामस्थांची फसवणूक केली. दिनांक 30/05/2021 रोजी ग्रामविकास अधिकारी व काही ग्रा सदस्य यांनी लिहून घेतलेला दारू परवाना विक्रीचा केलेला ठराव रद्द करणे बाबत खिर्डी बुद्रुक येथील ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सविस्तर वृत्त ,खिर्डी बुद्रुक ग्रा.पं यांची ग्रामसभा दि. 27/08/2021 रोजी चा अजिंठा प्रसिद्ध करण्यात आला होता. ती कोरोना अभावी तहकुब करण्यात आली होती ती सभा दि 30/5/2021 रोजी घेण्यात आली होती यात कोणताही विषय नसतांना किंवा चर्चा न करता जनाबाई काशिनाथ तायडे यांचे नावाने तांदलवाडी तालुका रावेर येथे असलेले देशी दारू चे परवाना दुकान खिर्डी बु येथे गट क्र ३८३ मध्ये जो घर नं. ग्राम. दप्तरी नाही किंवा एन. ए. नाही अशा भरवस्तीतील जागेवर नाहरकत परवानगी देण्याचा बोगस व खोटा ठराव ग्रामविकासअधिकारी विजयकुमार महाजन व काही ग्रा.प.सदस्य यांनी ग्रा. पं. दप्तरी खुल्याजागेवर ठराव लिहुन त्याच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव सो व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचेकडे पाठविला आहे,यापूर्वी ग्रामसभेमध्ये कोणतेही दारुचे परवाना दुकानास परवानगी देण्यात येऊ नये असा ठराव घेण्यात आहे.गांवात 2017 साली महिला ग्रामसभा घेऊन दारूबंदीचा ठराव करण्यात आला होता. सदरचा ठराव हा मीटिंग मधे न करता ग्रा.प दप्तरीत मागून लिहुन घेतला आहे सदर हा ठराव रद्द करून संबधितांवर योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी यावेली करण्यात आली.यावेळी 300 ते 400 गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन बोगस ठराव का केला असा जबाब विचारन्यासाठी ग्रामविकास अधिकारी विजयकुमार महाजन यांना सर्व ग्रामस्थांनी घेराव घालून जाब विचारला त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी निंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीसउपनिरीक्षक काशिनाथ कोळंबे , पोहेका स्वप्नील पाटील, बापू पाटील, व यांसह पोलीस कर्मचारी ताफा दाखल झाल्याने गर्दी ला पांगवण्यात आले. तात्काल घटनास्थळी रावेर येथील गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल , गटविस्तार अधिकारी डी एस सोनवणे ,ग्रामसेवक संघटनेचे सचिव उदय चौधरी, खिर्डी बुद्रुक ग्रामपंचायती मधे येवून रीतसर सर्व ग्रामस्थांना बोगस ठरावाच्या विरोधात अर्ज सादर करण्यासाठी ग्रामस्थांना सूचना केल्या. बोगस झाले.बोगस ठरावाला मंजुर करण्यासाठी जे संबधित ग्रामपंचायत सदस्य व ग्राम विकास अधिकारी विजयकुमार महाजन यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली.खिर्डी या गावात या पूर्वी वैध व अवैध दारू विक्रीचा ठराव 2017 मधे होवून 1519 महीलापैकी 885 महिलांनी मतदान करून खिर्डी गावातील बाटली आडवी केली होती त्यानंतर खिर्डी येथील दारू दुकाने सील करण्यात आली होती. परंतु पुन्हा ही वैध व अवैध दारू विक्री ची दुकाने काही दिवसाने पुन्हा सुरू झाली असल्याने परवाने धारक शासन मान्य दारू चे दुकान खिर्डी येथे येण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला.

प्रतिक्रिया किरण नेमाडे दारू इच्छुक व्यवसायिक

खिर्डी मधे दोन वर्षा पूर्वी सुद्धा गावात दारूबंदी साठी मी माझ्या परिवाराने तन मन धनाने पुढाकार घेतला होता परंतु गावात दारूबंदी होवून सुद्धा गावात पुर्वी पेक्षा जास्त दारू विक्री आज चालू आहे.आज ठरावाला विरोध करणारे बहुतांशी लोक त्या वेळेस मला मूर्ख समजून हसत होते . जर गांवात खूप प्रमानात अवैध विक्री होत असेल तर मि का वैध व्यवसाय करू नये ? असे आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

प्रतिक्रिया :-2 वैशाली पाटील प्रभारी सरपंच खिर्डी बुद्रुक

बनावट ठराव हा बेकायदेशीर असून ग्राम विकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुले घडलेला प्रकार आहे व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी .

प्रतिक्रिया 3 जगदीश कोचुरे माजी ग्रां. प. सदस्य

यात ग्राम पंचायत सदस्यांनी आर्थिक चिरीमिरी करून गौडबंगाल केला असून यात जे सहभागी असतील त्यांवर रीतसर कारवाई करण्यात

अडव्होकेट चंद्रजित पाटील-ग्रामस्थ

ग्रा.प.मध्ये दारू विक्रि दुकानाचा ठराव ग्राम सभेमध्ये न घेता अवैधरित्या घेवुन ग्रामस्थांची फसवणूक ग्रावि.अधिकारी व काही ग्रा.पं सदस्य यांनी संगमत करून आर्थिक देवान घेवाण झालेली दिसून येत आहे.या आधी सुद्धा काही तक्रारी केल्या आहेत परंतु वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष न दिल्यामुळे असे प्रकार घडत आहे संबंधितावर कारवाई व्हावी.गटविकास अधिकारी रावेर पंचायत समिती दीपाली कोतवाल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात येईल असे आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.ग्रामसेवक अधिकारी विजयकुमार महाजन

सदर घटने दरम्यान ग्रामविकास अधिकारी विजय कुमार महाजन यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

Spread the love