महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहे. एका सर्व्हेक्षणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशातील पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश झाला आहे. इंडिया टुडे माध्यम समुहातर्फे प्रत्येक राज्यातील नागरिकांना त्यांच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. ज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पहिल्या पाचमध्ये समावेश करण्यात आला आहे.
इंडिया टुडेच्या या सर्वेक्षणानंतर 43 टक्क्यांहून अधिक मतं मिळालेल्या नऊ मुख्यमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौथ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. सर्वोत्तम कामगिरी करण्याऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी स्थान मिळवलं आहे. असं असलं तरी या यादी पहिल्या पाच मध्ये भाजपच्या एकही मुख्यमंत्रीचा समावेश नाही आहे.











