जळगाव संदेश न्यूज नेटवर्क
ममुराबाद – ममुराबाद येथील ग्रामपंचाती ची इमारत पुर्णतः जिर्ण झाल्याने कधी जमीनदोस्त होईल अशी भीती येथील नागरीकांना होती.त्यासाठी जनसुविधे अंतर्गत सुसज्ज ग्रामसचिवालय उभारले जाणार आहे. सचिवालया सह विवीध कामांचे 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच हेमंत चौधरी यांनी दिली.
ममुराबाद येथील जुन्या इमारतीच्या जागेमध्ये सुमारे 25 लक्ष रुपये खर्च करून ग्रामसचिवालय उभारण्यात येणार आहे.











