चोपडा तालुक्यातील अडावद येथे रमजान ईद मिलन सण उत्साहात साजरा.कोरोना च्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून निर्बंध असल्याने सर्व सण उत्सव शासन निर्णयानुसार साजरे करत होते.यंदा नियम शिथिल झाल्याने रमजान ईद सण मोठ्या उत्साहात साजरा झाला.एक महिना पासून मुस्लिम बांधव कडक उन्हाळा असून पण उपवास करत होते. जातीय सलोखा कायम राहावा म्हणून हिंदु-मुस्लिम-बौद्ध बांधवांना काजुबदामचा शिरखुरमा देण्यात आला.व बांधवांनी एकमेकांना ईद च्या व अक्षय तृतीया च्या शुभेच्छा दिल्या.यावेळी अडावद पो.स्टेशन चे एपीआय किरण दांडगे साहेब ,माजी.आमदार अरूण भाई गुजराथी, चंद्रहास भाई गुजराथी ,राजु पाटील, गोटू शेट, पिंटू शेट, समाज सेवक रियाज अली(कालु मेंबर),पी.आर.माळी सर,उपसरपंच जावेद खान, फकिरा मेंबर, मोहसीन मेंबर, विजय मेंबर, अल्पसंख्याक सेवा संघ चे प्रदेश अध्यक्ष जहांगीर ए खान,सर्व मान्यवर व पत्रकार बंधु यांचा सत्कार करण्यात आला.यावेळेस मुन्सफ खान,आसीफ खान,अजीज खान,सद्दाम खान,वकिल खान,हुसेन खान, शकिल खान, जफर भाई ,अजीम खान,असलम खान, अमजद खान, साजीद खान, आदींची उपस्थिती होते.कार्यक्रमाचे आयोजन हे अल्पसंख्याक सेवा संघ चे जिल्हा महासचिव जुनेद एम खान यांनी केले.











