मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला आजच्या सभेतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देणार प्रत्युत्तर!

0
44

मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल(शनिवार) मुंबईत बीकेसीमध्ये घेतलेल्या जाहीर सभेत भाजपासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनेसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले. विविध मुद्य्यांवरून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांच्या या सभेनंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये सभा होणार आहे. या सभेत फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देणार आहेत. तसा त्यांना कालच ट्वीट करून सूचक इशारा देखील दिला होता.

उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या ट्वीटमध्ये उद्धव ठाकरेंचं नाव न घेता ‘टोमणे बॉम्ब’ म्हणत टोला लगावला होता. तसेच, “सर्वत्र पळापळ अन् गदारोळ, नागरिक भयभीत अन् विरोधक दहशतीत. सर्वत्र सन्नाटा अन् लोक घामाघूम… अरे छट. हा तर निघाला आणखी एक टोमणे बॉम्ब. जवाब मिलेगा और ठोक के मिलेगा”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीस नेमकं काय उत्तर देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या या सभेची भाजपाकडूनही जोरदार तयारी करण्यात आली आहे. सभेच्या ठिकाणी मोठ्यासंख्येने भाजपाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते दाखल होत आहेत. सभेसाठी आलेल्या सर्वांना भगव्या रंगाच्या टोप्या आणि हनुमान चालिसेची पुस्तिका दिली जात आहे.

Spread the love