लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सेवाभावे प्रतिष्ठानाकडून तळोदा येथील परिसरात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0
40

तळोदा -: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सेवाभावे प्रतिष्ठान,तळोदा व महात्मा फुले सामाजिक लोकविकास बहुउद्देशीय संस्था संयुक्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त तळोदा गावात कालिका माता परिसर व साठे गल्लीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला वक्ते श्री.किशोर चव्हाण सामजिक समरसता विभाग कार्यकर्ता, या वेळी श्री.प्रदीप शेंडे ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भाजपा, श्री.हेमलाल मगरे सर स्विकात नगरसेवक, श्री.शिरीष माळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा हे होते.या कार्यक्रमाचे प्रमुख सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.उमेश भैय्या विजय सोनवणे हे होते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाची सूत्रसंचालन श्री. अंबालाल भाऊ साठे अध्यक्ष म.फुले.सा.लो.ब.संस्था यांनी केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.उमेश भैय्या विजय सोनवणे यांनी केली

यावेळी श्री किशोर जी चव्हाण हे म्हणालेत की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या लेखणीतून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. नुसताच अण्णाभाऊंच्या विचार समाजापुढे जावा म्हणून सेवाभावे प्रतिष्ठानने हा जो उपक्रम राबवला आहे याला आपण अण्णाभाऊंच्या लेखणी असेही म्हणू शकतो लहान बालकांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी सेवाभावे प्रतिष्ठानने केलेला हा उपक्रम आहे.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जीवन अहिरे अनुसूचित जाती मोर्चा तळोदा शहरध्यक्ष, गणेश अहिरे, सेवाभावे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संतोष जगत चौधरी ,उपाध्यक्ष सागर पाटील, सचिव कविता दिलीप कलाल,संचालक नकुल दित्या ठाकरे,श्री.अतुल भिमसिंग पाटील,श्री.अनिल भामु नाईक यांनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे आभार जीवन भाऊ अहिरे यांनी केला

Spread the love