पौर्णिमा बुचके यांचा मर्दानी महाराष्ट्राची 2022 राज्यस्तरीय अवॉर्ड देऊन गौरव 

0
51

प्रतिनिधि : दत्ता बोईनवाड

पुणे जिल्ह्यातील पत्रकार कुमारी पौर्णिमा बुचके यांना एस. एस. सिनेव्हिजन ( सिकंदर सय्यद – सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता लेखक दिग्दर्शक ) तसेच आझाद फाउंडेशन यांकडून मर्दानी महाराष्ट्राची 2022 राजस्तरीय अवॉर्ड देण्यात आला.

मर्दानी महाराष्ट्राचे 2022 पुरस्कार सोहळा पुणे मधील येरवडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवनामध्ये अत्यंत उत्कृष्टपणे पार पडला . एस एस सिनेव्हिजन व आझाद फाउंडेशन आयोजित मर्दानी महाराष्ट्राचा अवॉर्ड केंद्र सरकार नोंदणी कृत पुरस्कार सामाजिक,प्रशासकीय, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कर्तबगार महिलांच्या कार्याचा गौरव व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील एकूण 75 महिलांना हा पुरस्कार देण्यात आला. जबाबदारी सांभाळून आलेल्या प्रत्येक संकटाला न घाबरता त्याच्याशी ताठ मानेने लढण्याची परंपरा आणि वारसा राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले,अहिल्याबाई होळकर व इतर अनेक स्त्रियांच्या रूपाने महाराष्ट्राला लाभलेला आहे. ह्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेत्री, शासकीय अधिकारी, पत्रकारिता क्षेत्रातील देखील उपस्थित होते.

Spread the love