भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा तर्फे ९ ऑगस्ट विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा

0
45

जळगाव – आदिवासी गौरव दिनानिमित्त दि. ९ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर व भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जळगाव महानगर तर्फे आदिवासी गौरव दिनानिमित्त

भाजपा जळगाव जिल्हाध्यक्ष तथा आमदार मा. सुरेश दामू भोळे (राजु मामा भोळे)भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष मा. दिपक भाऊ सुर्यवंशी यांच्या हस्ते क्रांतीकारक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले

भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी आदिवासी गौरव दिवस साजरा करण्याचे आयोजन केले

आदिवासी अस्मितेसाठी, हक्कासाठी आदिवासी समाजासाठी ज्या ज्या थोर स्त्री , पुरुषांनी, महात्मांनी आपले आयुष्य झिजविले त्या राष्ट्रपुरुष, महापुरुष व क्रांतीकारकांना कॄतार्थतेने यावेळी नेत्यांच्या, मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले

आदिवासी जमातींचे अस्तित्व मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ९ ऑगस्ट १९९४ या दिवशी विश्व आदिवासी दिवस घोषित केला तेव्हा पासून दरवर्षी या दिवशी विश्व आदिवासी गौरव दिवस साजरा केला जातो . यावेळी समस्त आदिवासी बांधवांना भारतीय जनता पार्टी च्या वतीने शुभेच्छा दिल्या

भारत माता की जय , वंदे मातरम्, आदिवासी दिनाच्या , क्रांती दिनाचा विजय असो. अमर रहे अमर रहे बिरसा मुंडा अमर रहे. अशा घोषणा देण्यात आल्या.या आदिवासी गौरव दिनाच्या कार्यक्रमात आदिवासी नेते जळगाव जि.प. सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे जेष्ठ नगरसेवक कैलास अप्पा सोनवणे, नगरसेवक भरत कोळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद सपकाळे, प्रदेश उपाध्यक्ष सौ. उज्वला ताई बेंडाळे , माजी महापौर सौ. भारती ताई सोनवणे, विधानसभा प्रमुख दिपक साखरे, महिला महानगर जिल्हाध्यक्षा सौ. दिप्ती ताई चिरमाडे, रेखाताई वर्मा, रेखाताई कुळकर्णी, नगरसेविका गायत्री राणे, दिपमाळा काळे, अँड सुचिता हाडा , सरचिटणीस विशाल त्रिपाठी महेश जोशी , डॉ राधेश्यामजी चौधरी, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्षा लताताई बाविस्कर, नगरसेवक राजू मराठे , धिरज भाऊ सोनवणे , चंद्रशेखर पाटील, डॉ विरेन खडके, महेश चौधरी, मयुर कापसे शक्ती महाजन, अजित राणे,परेश जगताप अनुसूचित जमाती मोर्चा चे योगेश कोळी दिलीप कोळी युवराज सपकाळे संतोष तायडे, मनोज भांडारकर,

अक्षय जेजुरकर महेश पाटील, अनुसूचित जाती प्रदेश सचिव प्रा संजय मोरे सर ऑटो रिक्षा स्कूल व्हॅन आघाडी अध्यक्ष प्रमोद वाणी, हाॅकसऀ आघाडी अध्यक्ष प्रभाकर तायडे अनुसूचित जाती चे सुनील भाऊ जाधव सचिन बाविस्कर, प्रकाश पंडित, अक्षय चौधरी, राहुल वाघ , जयेश भावसार, गणेश वाणी, अल्पसंख्याक आघाडी चे गुड्डू भाई, रियाझ शेख , संजय तिरमले, यांच्या सह भाजपा जळगाव जिल्हा / महानगर / अनुसूचित जमाती मोर्चा पदाधिकारी , मंडळ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख आघाडी, मोर्चा चे अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love