शिर्डीतून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक आणि पंजाब दहशतवादी विरोधी पथक यांनी संयुक्त कारवाई केली आहे.
पंजाबमधल्या राजिंदर या दहशतवाद्याला शिर्डीतून अटक करण्यात आली आहे. १६ ऑगस्टला पंजाब पोलीस दलातील पोलीस निरीक्षकाच्या वाहनाला IED लावून ती स्फोटात उडवण्याचा कट त्याने आखला होता असा आरोप आहे. पंजाब (Panjab) आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्त कारवाई करत या दहशतवाद्याला अटक केली आहे.
१६ ऑगस्ट रोजी पंजाब पोलिसांच्या पीएसआयच्या गाडीला एलईडी (IED) लावून उडवण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला होता. त्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी आणि महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत राजेंदरला बेड्या ठोकल्या. आरोपीला पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले असून अधिक तपास सुरू आहे. याबाबतची आणखी सविस्तर माहिती लवकरच पाेलिस दल देणार आहे.










