सरकारने बसमधील मनमौजींना लगाम घालण्यासाठी आता महत्वाचे पाऊल उचलले आहे. बसमधील महिलांना बघत बसणे, त्यांना इशारे करणे या रोमियोंना महागात पडणार आहे. त्यामुळे बसमध्ये वाकड्या नजरेने बघाल तर खबरदार असा इशाराच तामिळनाडू सरकारने मनमौजींना दिला आहे. तसेच त्यांची रवानगी थेट तुरुंगात करण्यात येईल असेही म्हंटले आहे.
सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार, बसमध्ये प्रवास करणारी व्यक्ती महिलेला छेडत असेल किंवा तिच्यासोबत गैरवर्तन करत असल्यास बसच्या कंडक्टरने त्या प्रवासाला रस्त्यातच उतरवावे अन्यथा त्याला पोलीसांकडे सोपवण्यात यावे. तसेच महिलांसोबच योग्य वर्तन न केल्यास कंडक्टरलाही शिक्षा मिळेल. तसेच कंडक्टरने मदत करण्याच्या बहाण्याने महिला प्रवाशाला स्पर्श केल्यास किंवा तिच्यावर काही टिपणी केल्यास त्यालाही शिक्षा होईल.
सुधारित नियमावलीनुसार, कंडक्टरने स्वत:जवळ एक तक्रार पुस्तिका ठेवावी. ज्यामध्ये प्रवासी आपली तक्रार त्यात मांडू शकतात. गरज पडल्यास ही पुस्तिका मोटार वाहन प्राधिकरण किंवा पोलिसांकडे सादर करावे लागेल.










