कथित पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी विशेष पीएमएलए न्यायालयाने शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत 5 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे.
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत विशेष पीएमएलए न्यायालयाने 5 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. कथित पत्राचाळप्रकरणी ‘ईडी’ने 31 जुलै रोजी खासदार संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना सत्र न्यायालयाने 8 ऑगस्टपर्यंत कोठडी दिली होती. त्यानंतर 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. आज कोठडीची मुदत संपल्यानंतर राऊत यांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढ करण्यात आली.










