’50 खोके, एकदम ओके’ची घोषणा जिव्हारी लागली!! विधीमंडळाच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की

0
43

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून आज पाचव्या दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार राडा झाला. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधीपक्षाचे आमदार आमनेसामने आल्याने प्रचंड गोंधळ उडाला. सत्ताधारी आमदार समोर येताच विरोधकांनी ’50 खोके एकदम ओके, अन् खावून खावून माजलेत बोके’, या घोषणा दिल्या. या घोषणा जिव्हारी लागल्याने सत्ताधारी बिथरले आणि त्यानंतर जोरदार राडा झाला.

चोरांच्या मनात चांदणे’

दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले. 17 तारीख झाली, 18 तारीख झाली आम्ही रोज सुरुवातीला या पायऱ्यांवर येऊन घोषणा द्यायचो. परंतु त्या घोषणा शिंदे गटाला त्यांच्या आमदारांना एवढ्या झोंबल्या की कधी आतापर्यंत मी बरेच वर्ष काम करतोय, आम्ही सत्तेत असतानाही विरोधी पक्ष इथे घोषणा द्यायचा. आम्ही कधी त्यांना अडवले नाही, पण आज जाणीवपूर्वक ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये या सर्व घोषणा दाखवल्या गेल्या आणि त्याच्या बद्दल जनमाणसात या लोकांची प्रतिमा मलिन झाल्याची शंका त्यांनाच आली. मराठी भाषेमध्ये म्हणतात ना ‘चोराच्या मनात चांदणे’ तसा प्रकार घडला, असे अजित पवार म्हणाले.

50 खोके, एकदम ओके’ घोषणा जिव्हारी लागली

वास्तविक आता उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, आज अचानक तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला माहितीय साधारण साडे दहा वाजता महाविकास आघाडीचे आमदार एकत्र यायचो आणि वेगवेगळ्या घोषणा द्यायचो. परंतु त्याच्यातील 50 खोके एकदम ओके ही घोषणा एवढी जिव्हारी लागली की आज त्यांच्यातील आमदार इथे आले आणि घोषणा देऊ लागले, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

आई-बहिणीवरून शिव्या देण्याचा प्रयत्न

महाविकास आघाडीच्या कालच्या बैठकीमध्ये आज सकाळी शेतकऱ्यांचा मुद्दा मांडण्याचे ठरले होते. परंतु तत्पूर्वी सत्ताधारी आमदार प्लॅन करून जमले आणि घोषणाबाजी करू लागले. महाविकास आघाडीचे आमदार जमल्यानंतर सत्ताधारी आमदारांनी भांडण उकरून काढले आणि दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. आम्ही शांततेने उत्तर दिले. यावेळी आई-बहिणीवरून शिव्या देण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला.

आम्हाला मारून टाकायचंय का?

तसेच आम्ही निष्कलंक असल्याचा दाखवण्याचा शिंदे गटाच्या आमदारांचा प्रयत्न आहे, असेही अमोल मिटकरी म्हणाले.

आम्हाला मारून टाकायचंय का? असा सवाल करणाऱ्यांना आवारागर्दी करणाऱ्यांना समज द्या जशास तसे उत्तर देऊ असं म्हणत असाल तर आम्हालाही तसं म्हणता येते, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Spread the love