वर्गात मुला-मुलींनी बाजूला बसल्याने सांस्कृतिक अराजकता माजते, केरळ येथील नेत्याचं वादग्रस्त विधान

0
45

वर्गात मुला-मुलींनी बाजूला बसणं हे हिंदुस्थानी संस्कृतीच्या विरुद्ध असून त्यामुळे सांस्कृतिक अराजकता माजत असल्याचं विधान केरळ येथील एका नेत्याने केलं आहे. वेल्लापल्ली नतसेन असं या नेत्याचं नाव आहे. नतसेन हे हिंदू एझावा या समुदायाचे नेते असून मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांचे निकटवर्तीय मानले जातात.

रविवारी येथील समान शिक्षण धोरण आणि लैंगिक समानतेशी संबंधित विषयांवर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलते होते. ते म्हणाले की, आपल्या संस्कृतीत मुलगा आणि मुलगी यांना बाजूला बसणं आणि मिठी मारणं या कृती निषिद्ध आहेत. ख्रिश्चन आणि मुस्लीम शिक्षण संस्थांमध्ये हे होताना दिसत नाही. ही आपली संस्कृती नाही. आपण इंग्लंड आणि अमेरिकेत राहत नाही, असं ते यावेळी म्हणाले.

मुलगे-मुली एकमेकांच्या बाजूला बसल्याने सांस्कृतिक अराजकता निर्माण होते. हे विशेषतः हिंदू संघटनांच्या महाविद्यालयांमध्ये होताना दिसतं, असं विधानही त्यांनी यावेळी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे नवीन वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

Spread the love