मुंजलवाडी – धनगर समाज संघर्ष समितीची राज्यस्तरीय बैठक डॉ.महात्मे आय हाॅस्पिटल मुलूंड-मुंबई या ठिकाणी माजी खासदार डॉ.विकास महात्मे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर प्रदेशध्यक्ष बापुसाहेब शिंदे, उपाध्यक्ष पंडित आण्णा मदणे, सचिव हरिष खुजे, सौ.सुनिता महात्मे, संतोष महात्मे तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वरभाऊ पाटील उपस्थित होते.यावेळी राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारींनी उपस्थित होते तसेच धनगर समाज संघर्ष समितीचे जळगांव जिल्हाध्यक्ष संदीपभाऊ सावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात डॉ. महात्मे यांनी सांगितले कि संघर्ष समितीची बैठक कोरोना काळानंतर अर्थात दोन वर्षानंतर प्रथमच संपन्न होत असुन त्यांचा आम्हाला आनंद झाला त्यामुळे पदाधिकारींचे आभार मानले व समितीची पुढील वाटचाल धनगर समाजाला न्याय मिळावा यासाठी संघर्ष समितीचा लढा सुरूच राहील धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी सरकारने लवकरात लवकर करावी यासाठी पाठपुरावा केला जाईल धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी व 22 योजना शासनाने मंजूर केल्या आहेत त्या योजना समाजात तळागळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम समितीच्या कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन डॉ.महात्मे यांनी केले मेंढपाळ व्यवसाय करणारे समाज बांधवांना वनचराई पास मिळाली पाहिजे मेंढपाळांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरु राहिल संघर्ष समितीची नविन कार्यकारिणी व मोर्चाबांधणी केली जाईल आणि लवकरच मराठवाड्यात संघर्ष समितीचा मेळावा घेतला जाईल यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले….
मुंजलवाडी प्रतिनिधी:- चंद्रकांत वैदकर
धनगर समाज संघर्ष समितीची राज्यस्तरीय बैठक डॉ.महात्मे आय हाॅस्पिटल मुलूंड-मुंबई या ठिकाणी माजी खासदार डॉ.विकास महात्मे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर प्रदेशध्यक्ष बापुसाहेब शिंदे, उपाध्यक्ष पंडित आण्णा मदणे, सचिव हरिष खुजे, सौ.सुनिता महात्मे, संतोष महात्मे तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वरभाऊ पाटील उपस्थित होते.यावेळी राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारींनी उपस्थित होते तसेच धनगर समाज संघर्ष समितीचे जळगांव जिल्हाध्यक्ष संदीपभाऊ सावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात डॉ. महात्मे यांनी सांगितले कि संघर्ष समितीची बैठक कोरोना काळानंतर अर्थात दोन वर्षानंतर प्रथमच संपन्न होत असुन त्यांचा आम्हाला आनंद झाला त्यामुळे पदाधिकारींचे आभार मानले व समितीची पुढील वाटचाल धनगर समाजाला न्याय मिळावा यासाठी संघर्ष समितीचा लढा सुरूच राहील धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी सरकारने लवकरात लवकर करावी यासाठी पाठपुरावा केला जाईल धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपयांचा निधी व 22 योजना शासनाने मंजूर केल्या आहेत त्या योजना समाजात तळागळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम समितीच्या कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन डॉ.महात्मे यांनी केले मेंढपाळ व्यवसाय करणारे समाज बांधवांना वनचराई पास मिळाली पाहिजे मेंढपाळांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा सुरु राहिल संघर्ष समितीची नविन कार्यकारिणी व मोर्चाबांधणी केली जाईल आणि लवकरच मराठवाड्यात संघर्ष समितीचा मेळावा घेतला जाईल यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले….










