यावल – शहरातील विस्तारित भागातील विरार नगरच्चा पाठीमागे तडवी कॉलनीच्चा समोर १३२ केव्ही च्चा भितिं मागे समाज कार्यालय निकृष्य दर्जाचे बांधण्यात येत आहे समाज कार्यालयाचे व्हॉल कंपाऊंडचे कॉलमचे खड्डे ७ फुट नसून ४ फुट खोदले गेले आहे. तरी त्यात फोन्डेशनची आसारी १२ एम एम नसून १० एम एम टाकण्यात आली आहे .

तरी त्यात दगड गोटे भराव करून त्यात हडकाई नदिची वाळू गिरावल _टाकून_ काम सुरु आहे , रेतीचे वापर न करता दगडाची कच याचे वापर होत आहे व सलग १ वर्षापासून समाज मंदिर बांधण्यात आले आहे त्यात वापरण्यासाठी पाणी नाही , व दिवा बत्ती नाही व मेन गेट न बसवले गेले तसेच खिडकी नाही सौचालयास दरवाजे नाही हेच काम १ वर्षापासून अपुर्ण आहे तसेच व्हॉल कंपाऊट मध्ये भ्रष्टाचार सुरु आहे.तसेच १३२ केव्ही चे मेन तार कंपाऊंटच्या वरतून गेले आहे तरी इमारतीच्चा समोर समाज कार्यक्रम असतांना शॉर्ट सर्किट झाल्यास जिवाची हानी होऊ शकते.
संबंधित यावल नगरपरिषदेचे मुख्याअधिकारी यांनी जागेची पाहणी केली का नाही ,हे नागरिकां मध्ये सांगण्यात येत आहे . तरी या कामाची चौकशी करावी .तर याची चौकशी न केल्यास जिल्हाआधिकारि यांच्याकडे तक्रार करण्यात येईल असे नागरिकांनी सांगितले आहे










