धक्कादायक ! भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार, एक जखमी

0
102

ममुराबाद रस्त्यावरील घटना

जळगाव -: शहरापासून जवळ असलेल्या ममुराबाद फार्मसी महाविद्यालयात कॉलेजला जात असलेल्या दुचाकीला भरदार ४०७ मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी जागीच ठार झाला आहे.

फैसल मुस्ताक पटेल वय २०, रा.मास्टर कॉलनी, जळगाव महेश झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याच्यासोबत वासीक खान युसुफ खान वय २०, रा. मास्टर कॉलनी जळगाव हा जखमी झाला आहे.

जळगाव शहरातील मास्टर कॉलनीमध्ये फैसल पटेल हा तरुण ममुराबाद रोडवरील अरुणामाई कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात बी फार्मसीच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत होता. नेहमीप्रमाणे शनिवारी १ मार्च रोजी सकाळी१० वाजेच्या सुमारास फैसल हा त्याचा मित्र वासीक याच्यासोबत दुचाकीने जळगावकडून महाविद्यालयाला ममुराबाद रोड वरून जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या ९०९ वाहन क्रमांक (एमएच १३ एएन ४४४५) जोरदार धडक दिली. या वाहनात विटा भरलेले होते. या भीषण अपघातात फैसलचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सोबत असलेला वासीक हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली होती. दरम्यान फैजल हा घरातील एकुलता एक मुलगा असल्याने आई-वडिलांसह त्याच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केल्याचे दिसून आले. सदर घटनेबाबत तालुका पोलीस स्टेशन मध्ये नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Spread the love