उष्माघात टाळण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी यांचे आदेश.

0
49

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढला असून तापमान ४३ ते ४७ अंशावर पोहोचले आहे त्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता असल्याने उष्माघात टाळण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी खालीलप्रमाणे आदेश पारित केला आहे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उष्माघातामुळे नागरीक, कामगार व विद्यार्थीना उष्मघाताचा त्रास होऊ नये म्हणून खाजगी क्लासेसच्या वेळेत बदल करणे व कामगारांसाठी आवश्यक सेवा पुरविणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात दि.२५ मे च्या सकाळी १२ ते ३ जून च्या रात्री १२ वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात येत असून पुढील आदेश देण्यात आले आहे

१) वरील कालावधीत अंगमेहनत करणाऱ्या कामगारांनी उन्हात काम करु नये तसेच कामगारांकडून उन्हात काम करुन घेता येणार नाही.

२) ज्या कामाच्या ठिकाणी अत्यावश्यक काम असेल अशा ठिकाणी कामगारांना काम करण्यासाठी पुरेसे शेड तयार करणे तसेच कुलर किंवा तत्सम साधनांची व्यवस्था करणे संबंधित मालकांची राहिल या बाबत काही एक तक्रार असल्यास संबंधित ग्रामपंचायत, नगरपरिषद, पोलीस विभाग यांच्याकडे करता येईल.

३) खाजगी कोचिंग क्लासेस च्या संचालकांनी सकाळी १० वाजेपर्यंत कोचिंग क्लासेस चालवावेत तद्नंतर सकाळी १० ते ५ या वेळेत कोचिंग क्लासेस सुरू ठेवायचे असल्यास कोचिंग सेंटर मध्ये पुरेसे पंखे,कुलर व तत्सम साधनांची व्यवस्था करण्याची जबाबदारी खाजगी कोचिंग क्लासेस संचालकांची राहील.

सदरचा आदेश हा सर्व संबंधितांवर वैयक्तिक रित्या नोटीस बजावणी करण्या बाबत पुरेसा कालावधी नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार एकतर्फी काढण्यात येत असल्याचे आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव यांनी कळविले आहे.

Spread the love