मिंधेंचा 1500 कोटींचा घोटाळा होणार उघड! दिल्लीतल्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष

0
43

मुंबई = राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा आज भंडाफोड होणार आहे. महायुती सरकारचा मोठा घोटाळा आज उघड होणार आहे. राजधानी दिल्लीत सुप्रीम कोर्टाचे वकील आनंद जोंधळे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली आहे.

सुप्रीम कोर्टाचे वकील आनंद एस. जोंधळे यांनी दिल्लीत फॉरेन कॉरस्पॉडेन्ट्स क्लब येथे दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषेदत मुख्यमंत्र्यांचा 1500 कोटींचा घोटाळा उघड करण्यात येणार आहे. यामुळे या पत्रकार परिषदेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love