विषारी औषध सेवन केल्याने तरूणाचा मृत्यू

0
64

जळगाव संदेश न्यूज नेटवर्क

जळगाव -: ३८ वर्षीय तरुणाने विषारी औषध घेतल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संभाजी रमेश ढेंगळे (वय ३८, रा. इंदिरानगर, शिरसोली, ता. जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील इंदिरा नगरात संभाजी ढंगळे हे वास्तव्यास होते. त्यांनी गुरुवार २४ ऑक्टोंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास काहीतरी विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार त्यांच्या कुटुुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संजीव मोरे हे करीत आहे.

Spread the love