पिंप्राळा येथे ऍग्री स्टॅक फार्मर आयडी कॅम्प योजनेत 200 शेतकऱ्यांनी घेतला लाभ

0
60

जळगाव – तहसील कार्यालय तसेच तलाठी कार्यालय पिंप्राळा आयोजित एक दिवसीय ऍग्री स्टॅक फार्मर आयडी कॅम्प उत्साहात पार पाडला.

यावेळी आराध्या महाईसेवा केंद्राचे संचालक अमोल पढार व शेखर पढार यांचे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.२०० शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.

26 जानेवारी निमित पिंप्राळा येथे ऍग्री स्टॅक फार्मर आयडीचा एक दिवसीय कॅम्प तहसील कार्यालय तसेच पिंप्राळा तलाठी कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आला. यात २०० शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. कार्यक्रमाला आमदार राजू मामा भोळे, तहसीलदार शितल राजपूत ,नायब तहसीलदार राहुल वाघ यांची उपस्थिती होती.

या कॅम्पमंध्ये तहसीलदार राजपूत यांनी सर्व शेतकऱ्यांना आपला फार्मर आयडी त्वरित बनवून घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच या कॅम्पला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पिंप्राळा राजू बाऱ्हे,तलाठी पिंप्राळा मारुडे भाऊसाहेब मंडळ अधिकारी पिंप्राळा मालती चाफले, सहाय्यक तलाठी पिंप्राळा रवीना पवार,राजेश वराडे,रितेश लाडवंजारी,संजय अहिरे तसेच आराध्या महाईसेवा केंद्राचे संचालक अमोल पढार, शेखर पढार प्रेम बुंदे अली शेख, प्रशांत पोतदार शमीर तडवी, दीपक देवरे, संकेत कोल्हे, दर्शन खैरनार, निलेश बडगुजर, धनराज ब्राह्मणे, विशाल धनजे, आदींनी कॅम्प यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

Spread the love