दिपक नेवे
यावल -हिंदु संस्कृती मध्ये कन्यारत्नांना विशेष महत्व दिले जाते . कन्या हि एकाच पिढीचा नव्हे तर दोन पिढयांचा उद्धार करते म्हनुन कन्यांना शुभ मानले जाते .. सध्या धामधुम सुरू आहे ती शारदीय नवरात्रत्सवाची ७ तारखेपासुन शारदीय नवरात्रीला प्रारंभ झाला नवरात्रोत्सवाच्या ९ दिवसांत देवीच्या विविध रुपांची उपासना केली जाते . नवरात्र उत्सव काळात आदीशक्ती, नारी शक्तीचा जागर मोठ्या भक्तीभावाने केला जातो . सलग नऊ दिवस महिषासुरांशी युद्ध करुन असत्यावर सत्याचा विजय मिळवणाऱ्या देवीच्या तेजस्वी रुपांची पुजा या काळात केली जाते . असे म्हटले जाते की प्रत्येक स्त्री मध्ये आदिशक्तीचा अंश असते तीचे बाल रुप म्हणजेच कुमारिका हे साक्षात देवीचे रुप मानले जाते .पंचमी षष्टी, सप्तमी कींवा अष्टमी, व नवमी दसऱ्या पर्यंत कुमारीका पुजन कींवा बालिका पुजन केले जाते . कुमारींकांसमवेत एका मुलाचेही पुजन करण्यात येते .
यावल तालुक्यातील शिरागड येथील सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जात असल्याचे स्थानीक गावकऱ्यांनी सांगीतले या बालिका पुजनाच्या याच शुभ नवरात्रीचे उद्धीष्ट साधत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . बालिकांचे पाय ,जल, आणी दुधाने धुवुन स्वच्छ कापडाने पुसुन घेत त्यावर हळद,- कुंकु लावीत पानाचा विडा देऊन हातात लाल धागा बांधण्यात आला . त्यानंतर केळी, खजुर, खोबरे व प्रसाद म्हणुन लाही यांचा वापर करण्यात आला .नंतर पुजन झालेल्या कुमारी कांना भेट म्हणून रुमाल, पेन, पेन्सील, पुस्तक, मेहंदीचा कोन व दक्षिणा देत कुमारीकांचे व कुमार यांचे पुजन करून त्यांना भोजन देण्यात आले . भोजनामध्ये गोड म्हणुन खीर, पुरी व भाजी यांचा समावेश केला गेला .
अध्यक्ष शांताराम सोळंके पो.पा.सुधाकर सोळंके सरपंच योगीताताई सोनवणे ग्रामपंचायत सदस्य प्रतापदादा सोनवणे योगेश सोळंके यांचे विशेष अनमोल सहकार्य लाभले .विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी महिलावर्गानेही माता जगदंबेची उपासना करीत मोठ्या संख्येने उपस्थिती दिली . पुजनानंतर गावातील इतर बाल गोपाळ व भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले .












