दिपक नेवे
चोपडा विधानसभेचे मा. आमदार आण्णासाहेब श्री. चंद्रकांत सोनवणे यांनी शिरसाड गावात सदिच्छा भेट दिली. भेटी दरम्यान शिरसाड गावातील मा. उपसरपंच धनंजय पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. भेटी दरम्यान आण्णासाहेब श्री. चंद्रकांत सोनवणे यांची अखिल भारतीय कोळी महासंघ नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य तेजस पाटील व ग्रामस्थांच्या वतीने आण्णासाहेब श्री.चंद्रकांत सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिरसाड गावाचे माजी उपसरपंच धनंजय पाटील सर, माजी सरपंच व युवासेना तालुका प्रमुख गोटु भाऊ सोनवणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुन्ना भाऊ पाटील विरावली, तालुका प्रमुख रवी भाऊ सोनवणे वढोदा, योगेश भाऊ पाटील आडगाव, सूर्यभान भाऊ पाटील दोणगाव , सुधाकर दादा पाटील वाघोदा, गोकुळ दादा कोळी मनवेल, वासुदेव दादा सोनवणे, सुरेश भाऊ सोनवणे, विशाल दादा इंगळे, दीपक दादा खंबायत, विष्णु भाऊ सोनवणे, अनिल दादा सोनवणे, ज्ञानेश्र्वर दादा सोनवणे, प्रभाकर भाऊ जाधव, लीलाधर दादा चऱ्हाटे, श्रीकृष्ण दादा शिरोळे, शिवम दादा पाटील, सारंग दादा सोनवणे, विकास भाऊ वाघ, किशोर दादा इंगळे, रुपेश भाऊ सोनवणे यासोबत आदी ग्रामस्थ उपस्थित होते.












