कुलभूषण पाटलांचा पराभव फेरमोजणी नाकारली; जळगाव महापालिका निकालानंतर गदारोळ

0
19

जळगाव -: महापालिका निवडणुकीच्या निकालात प्रभाग दहा ‘ड’मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार कुलभूषण पाटील पराभूत झाले. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना फेरमोजणीची मागणी केली.

मात्र, ती मान्य न केल्याने त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर आंदोलन केले. नंतर सायंकाळी मतमोजणी केंद्राबाहेर आल्यावर त्यांच्याकडे पिंप्राळा परिसरातील नागरिक भेटायला आले होते. तेव्हा त्यांना पराभवामुळे रडू कोसळले.

दरम्यान, अनोळखी लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिस अचानक झालेल्या प्रकाराने गांगरून गेले. मात्र, त्यांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. यामुळे येथे नागरिकांची पळापळ झाली.

काही वेळ महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. येथील वखार महामंडळाच्या गुदामात शुक्रवारी (ता. १६) महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना, प्रभाग दहा ‘ड’चे उमेदवार कुलभूषण पाटील १७६ मतांनी पराभूत झाले. या पराभवामुळे त्यांनी फेरमोजणीची मागणी केली. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी योग्य कारणाअभावी फेरमोजणी नाकारली.

Spread the love