कुऱ्हापानाचे शिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस उभ्या पिकांचे नुकसान !

0
6

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील ग्रामीण भागातील परिसरात वन्य प्राण्यांचा हैदोस वाढला असून शासनाने भरपाई द्यावी अन्यथा तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे. येथून जवळच असलेल्या

कुऱ्हा पानाचे परिसर व वराडसीम , सुनसगाव शिवारातील वन्यप्राण्यांचा वाढत्या संख्येने शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. रात्रीच्या वेळी शेतात घुसून वन्यप्राणी उभ्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकऱ्यांच्या मशागतीच्या मेहनतीवर क्षणात पाणी फिरत आहे. कपाशी, मका, भुईमूग ,सोयाबीन यांसारख्या पिकांचे नुकसान होत असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करून शेतात पहारा देत आहेत. मात्र वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी असलेली यंत्रणा वनविभाग प्रभावी उपाययोजना करण्यात अपयशी ठरत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

“आम्ही कर्ज काढून पीक उभं करतो, रात्रंदिवस मेहनत करतो; पण वन्यप्राणी एका रात्रीत सर्व पिक उद्ध्वस्त करतात. नुकसान झाल्यानंतर पंचनामा आणि आश्वासनांपलीकडे काहीच मिळत नाही,” अशी व्यथा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

वन्यप्राण्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करावी, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत आणि योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

कुऱ्हा पानाचे येथील शेतकरी अरविंद मधुकर बाविस्कर यांचे कुऱ्हा पानाचे शिवारातील गट नंबर ३९ मध्ये मका , भुईमूग पीक आहे पीक चांगले असताना एकाच दिवसात वन्य प्राण्यांनी आडवे केले पिकांचे नुकसान झाल्याने मुक्ताईनगर वनविभागाचे वन अधिकारी कृपाली शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता फोन बंद येत असल्याने संपर्क होत नसल्याने पिकांचे पंचनामे करून कोण नुकसान भरपाई देणार असे अरविंद बाविस्कर यांनी देशदूत ला माहिती दिली आहे.

Spread the love