सुनसगाव येथील मनुदेवी माता मंदिर रस्त्यावर घाणीचे साम्राज्य !

0
3

सुनसगाव येथील मनुदेवी माता मंदिर रस्त्यावर घाणीचे साम्राज्य !

प्रतिनिधी जितेंद्र काटे – भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील श्री मनुदेवी माता मंदीर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून भाविकांनी संताप व्यक्त केला आहे.

आता सुरू असलेल्या पावसामुळे तर या रस्त्यावर ये – जा करणे कठीण झाले आहे. या मंदिराकडे जाताना सुरवातीला उकिरडा झाला आहे या घाणीचा उग्र दर्प येत असल्याने या परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे विशेष म्हणजे पावसाळ्यात या मंदिराच्या प्रांगणात भोजनाच्या कार्यक्रमामुळे तर पंगतीला जाताना नाक दाबून जावे लागते. आता काही दिवसांपूर्वी याच मंदिराच्या आवारात श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराची स्थापना करण्यात आली आहे त्यामुळे गावातील महिला मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात मात्र या रस्त्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे तसेच मंदीराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणी सुध्दा चिखल व घाण पाण्याचे डबके साचले आहे त्यामुळे लवकरात लवकर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली असून गावातील काही गृप वर गावातील घाणीचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत.

Spread the love