सुनसगाव येथील श्री मनुदेवी माता मंदिरात भाविकांची मांदियाळी !

0
2

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील श्री मनुदेवी माता मंदिरात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत असून दर्शनासाठी दिवस रात्र भाविकांची गर्दी होत आहे.

येथे वाघुर नदीच्या काठावर श्री मनुदेवी माता मंदीर असून नुकतेच काही वर्षांपूर्वी गावातील ग्रामस्थ व भाविकांच्या मदत कार्यातून भव्य दिव्य असे मंदिर बांधकाम करुन मंदिरचा जिर्णोध्दार करण्यात आला आहे.

सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी माता मंदिर आडगाव ( यावल ) या ठिकाणी काही भाविक जाऊ शकत नाहीत त्यामुळे येथील मंदिरात येऊन भाविक भक्त मातेची ओटी भरुन आपल्या इच्छा आकांक्षा बोलून दाखवत आहेत.

या मंदिराचे काही वर्षांपूर्वी बाणे होते या बाण्यांची पुजा या ठिकाणी करण्यात येत होती.मात्र हे लहान छोटेसे मंदिर गावातील अनेक परिवाराचे कुलदैवत असल्याचे समजल्याने गावातील भाविकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी व राजकीय मंडळी यांनी मंदिराच्या बांधकामासाठी सढळ हाताने मदत केली आणि मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.

आता मंदिराच्या आवारात पत्री शेड टाकून कार्यक्रमासाठी, शिबीर व विवाह समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात येतात तसेच स्वयंपाकासाठी भांडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.दर पोर्णिमेच्या दिवशी भाविकांसाठी खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात येत आहे. नवरात्री मध्ये या मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत असून गेल्या तीन चार वर्षांपासून विजया दशमीला लकी ड्रॉ पद्धतीने या ठिकाणी मानाची पैठणी वाटप करण्यात येऊ लागली असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असल्याचे हभप लिलाधर पाटील यांनी सांगितले आहे.

Spread the love